शासनाच्या वतीने 17 सप्टेबर ते 2 आक्टोबर दरम्यान जनतेला शासकिय सेवा व योजना यांचा लाभ व्हावा तसेच प्रशासकीय कामकाजात गती यावी यासाठी सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असून तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार आशा संघवी यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार उपस्थित होते.