जालन्यात 5 वर्षांपासून धूरफवारणी ठप्प!, नाल्यांत औषधांचा थेंब नाही; महापालिकेविरोधात वंचित बहुजन आघाडीचा संताप जालना शहरातील नागरिकांना रोगराईपासून वाचवण्यासाठी दरवर्षी होणारी धूरफवारणी आणि नाल्यांमध्ये औषधं टाकण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून पूर्णतः ठप्प झाली आहे. तरीदेखील महापालिका धूरफवारणीच्या नावाखाली बोगस बिले उचलत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आज दि.22 शुक्रवार रोजी दुपारा बारा वा. च्या सुमार