पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींना परिमंडळ क्रमांक पाचच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गांजा देखील जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.