समृद्धी महामार्गावरील फर्दापूर टोलनाक्यावर मुंबईच्या सोन्याच्या व्यापाऱ्यावर झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. राजस्थानमध्ये राबविलेल्या विशेष मोहिमेतून आणखी दोन आरोपींना पकडण्यात आले. यापूर्वीच एका आरोपीला अटक झाली असून, आतापर्यंत तिघे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. त्यांच्या कडून काही प्रमाणात लुटलेले सोने जप्त करण्यात आले आहे.