सध्या परतीच्या पावसाने महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी पाणी साठले असून या कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. या कालावधीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आज गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले आहे. तसेच महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. सदर आढावा बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल येथे आयोजित करण्यात आली होती.