आज दि आठ स्पटेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता खिर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील मातकर यांची गंगापूर-खुलताबाद विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून मराठवाडा पदवीधर संघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच अक्षय नलावडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी निवड झाली. दरम्यान, खुलताबाद तालुक्यातील धामणगाव येथील माजी सरपंच गजानन आघाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.