आज शनिवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधांसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. मराठा आरक्षण या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, अशी समितीची आणि राज्य सरकारची भूमिका आहे. सदर बैठकीस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील उपस्थित होते.