चेन्नई ते शिर्डी असा प्रवास करणाऱ्या साईभक्त आज १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.शिर्डी नगरीत दाखल झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या ३१ दिवसापूर्वी चेन्नई येथून २५ भाविक हे शिर्डी येथे साईंचे दर्शनासाठी निघाले असता आज हे सर्व २५ भावीक शिर्डी नगरीत दाखल होतात साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी साईबाबा संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.