पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील एकता महिला प्रभाग संघ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत आहे. आज बुधवारी दुपारी १ च्या सुमारास वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्रीगंगा माता देवी हॉल, पोलादपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला तालुक्यातील विविध भागांतील सुमारे ५०० महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी उपस्थिती लावली.