सुखकर्ता दुखहर्ता म्हणून ओळख असणाऱ्या गणेशजींची गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भंडारा येथील स्व. भोजराज भोंडेकर वैद्यकीय महाविद्यालयात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. तब्बल पाचव्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास महाविद्यालयातील गणेशजींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थिती दर्शविली होती.