धाराशिव जिल्ह्यातील तेरणा मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्यांदा १४ दिवसात ओव्हर फ्लो झाला आहे. २८ ऑगस्ट पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरले असून नदीला महापूर आला आहे, ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजताची ही स्थिती आहे प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.