जोर्वे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकार्यावर हल्ला – प्रोसिडिंग रजिस्टर फाडून सरकारी कामात अडथळा संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी माहितीच्या मागणीवरून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. अधिकार्याची गच्ची धरून शिवीगाळ, धमक्या देत मारहाण करण्यात आली. याच दरम्यान आरोपीने सरकारी कामकाजात अडथळा आणत प्रोसिडिंग रजिस्टरची पाने फाडून नुकसान केले. या प्रकारामुळे कार्यालयीन वातावरणात एकच गोंधळ उडाला.