आज सकाळी चिखली येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन केले. दिवसाच्या पहिल्या ठोक्याला रात्री बारा वाजता महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर सकाळी सात वाजता महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्याचे पूजन व त्यांना दुग्धाभिषेक करण्यात आला.त्यानंतर विविध कार्यक्रम याप्रसंगी पार पडले.