कळंब येथील डोकी रोड परिसरात एका ३१ वर्षीय तरुणाला जातीयवादी शिवीगाळ करून दगडाने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रेम दयानंदन हौसलमल (वय ३१, रा. भिमनगर, कळंब) असे फिर्यादीचे नाव आहे, अशी माहिती कळंब पोलिसांच्या वतीने दोन सप्टेंबर रोजी सहा वाजता देण्यात आली.