वर्धा वनपरिक्षेत्र येथे एका दुर्दैवी घटनेने गावकरी भयभीत झाले आहेत. तामसवाडा गावातील शेतकरी गोपाळ चावरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या एका वासराची वाघाने शिकार केली. ही घटना 24 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. वाघाच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्यामुळे चावरे यांचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांच्या वतीने रात्री आठ वाजता योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे