नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा परिसरात हर्षद मात्रे यांचा बंगला असून ते गणेशोत्सवानिमित्त नातेवाईकांकडे गेले असताना गच्चीवरून त्यांच्या बंगल्यात चोरटे शिरले. घरातील 33 लाखांचा ऐवज या चोट्यांनी चोरला त्यानंतर बंगल्या शेजारी असलेल्या किराणामालाच्या दुकानाला चोरट्यांनी आग लावली आणि चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग नियंत्रणात आणली. बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.