भारत देश हा कृषिप्रधान देश आहे या अनुषंगाने भारतीय परंपरेमध्ये कृषी संबंधित अनेक सण उत्सव साजरी केले जातात यातील एक सण म्हणजे पोळा, संपूर्ण शेतकऱ्यांचा सर्वात मोठा असलेला सण बैलपोळा दिनांक 22 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. या मध्ये विधान परिषदेच्या आमदार तथा शिवसेनेचा नेत्या भावना गवळी यांनी मालेगाव येथे तर रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेअमित झनक यांनी आपल्या मूळ गावी मांगूळ येथे बैलपोळा साजरा केला.