महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत गावपातळीवरील सर्व सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजना सुलभ पोहचविण्याच्या दृष्टीने आपले सरकार सेवा केंद्र अधिक महत्वाचे आहेत. जिल्ह्यात प्रभावीपणे शासनाच्या योजना पोहचाव्यात यादृष्टीने जिल्हयातील रिक्त असलेल्या गावांसाठी आपले सरकार केद्राची जाहिरात 2025 प्रसिध्द करण्यात आलेली होती. ऑनलाईन अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.