मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली तालुक्यातील चरवेली ते कापडगाव दरम्यान आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना होता होता टळली. जयगडहून कर्नाटकला निघालेल्या एका एलपीजी गॅस टँकर मधून अचानक गॅस गलती सुरू झाली सुदैवाने मागून येणाऱ्या वाहन चालकाने प्रसंग सावधान राखून टॅंकर चालकाला याची माहिती दिली. यामुळे त्याने टँकर वेलीच थांबवला आणि पुढील अनर्थ टळला.