आ. विक्रम पाचपुते यांच्या घरी गणरायाची विधीवत स्थापना उत्साहात संपन्न श्रीगोंदा तालुक्यातील आमदार विक्रम पाचपुते यांच्या घरी यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्याचा शुभारंभ झाला. सकाळी शुभमुहूर्तावर कुटुंबीयांनी पारंपरिक विधीनुसार गणरायाची विधीवत स्थापना केली. मंत्रोच्चार, पूजा व आरतीने वातावरण मंगलमय झाले.