कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 5 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम बांधवांची ताज नगर येथून टिपू सुलतान चौक पर्यंत भव्य ईद निमित्त मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मदरसा मधील मुलं आणि शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. अत्यंत शांतीमय वातावरणात ही मिरवणूक संपन्न झाली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील होता.