ग्राम सिरेगावबांधच्या वतीने पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन कृत्रिमरित्या गौरी विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत सिरेगावबांध सहभाग नोंदवून उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता गावातील महिलांनी तलाव, बोळी व नाल्यांवर विसर्जन न करता ग्रामपंचायत तर्फे तयार केलेल्या निर्माल्य विसर्जन स्थळामध्ये दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ला सकाळपासून गौरी विसर्जनास सुरवात केली.