शेवगाव तालुक्यात तांदळाचा काळाबाजार, अन्नपुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह, शेवगाव शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात तांदळाचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. या काळया बाजारावर अंकुश ठेवण्यावर अन्नपुरवठा विभाग अपयशी ठरत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तांदूळ माफियांचा हिरवा कापड बांधलेला टेम्पो हेच त्यांचे ओळखचिन्ह बनले आहे. अशा प्रकारे खुलेआम काळाबाजार सुरू असूनही अधिकारी मात्र कुठलीही कार्यवाही करताना दिसून येत नाही.