बिहार राज्यातील मतदार अधिकारी यात्रेच्या वेळी दरभंगा या ठिकाणी, झालेल्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत, काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, दिवंगत आईबद्दल अपमान कारक वल्गना केली , हा प्रकार अत्यंत दुर्दैवी, लाजिरवाणा आणि समाजातील सौजन्य परंपरा व सुसंस्कृत वर्तणुकीला धक्का लावणार आहे, त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.