पंढरपूर येथील विष्णुपद मंदिराचे निकृष्ट काम करण्यात आले असून यांनी कृष्ण काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे. दरम्यान, या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील अंकुशराव यांनी दिला आहे. आज शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी मंदिर समितीवर आरोप केले आहेत.