नागरी वस्तीतून जाणाऱ्या वाहनांनी नियमांनुसार वेगमर्यादेत रहावे, यासाठी नगरपरिषद क्षेत्रात कमी वेगमर्यादा लागू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. जिल्ह्यातील विशेषत: २०१८ पूर्वीच्या जड वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या वेगमर्यादा चिप कार्यरत आहेत का, याची काटेकोर तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.रस्ते सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.