साकेगाव तालुका चिखली येथे अनेक अवैद्य धंद्याने जोर काढला आहे. या अगोदरही निवेदन उपोषणे केली परंतु काहीच फायदा झाला नाही. तात्पुरत्या स्वरूपात कारवाई झाली आणि परत परिस्थिती जैसे थे. त्याला कंटाळून शेवटी साकेगाव येथील सरपंच महिला ग्रामस्थ, तसेच महिला यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत पूर्णपणे दारूबंदी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया ग्रामस्थ नारायण परिहार यांच्या सह महिलांनी प्रसार माध्यमांची बोलताना दिली.