आखाडा बाळापुर ते वारंगा फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर कुठली शिवारात खाजगी बस व दुचाकीचा अपघात होऊन यामध्ये एक चार वर्षाचा बालक अन्य तिघेजण जखमी झाल्याची घटना आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी घडली असल्याची माहिती पोलिसाकडून सायं 6वा . प्राप्त झाली .या अपघातातील जखमींना रुग्णवाहिका बोलावून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .