जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारातून शेत गट क्रमांक १९ मधील एका शेतकऱ्याच्या गोट्यातून ८८ हजार रुपये किमतीच्या २० लहान-मोठ्या बकऱ्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली असून, या संदर्भात मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.