आज दिनांक सात स्पटेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात अली की कन्नड तालुक्यातील नेवपूर मध्यम प्रकल्पात आमदार संजना जाधव यांच्या हस्ते बोटीवरून श्रीफळ अर्पण करून जलपूजन पार पडले. यावेळी नेवपूरच्या सरपंच सुनीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश महाराज यांनी मंत्रोच्चारासह पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चना केली. याप्रसंगी आमदारांचा सत्कार तुकाराम वानखेडे व त्यांच्या पत्नी सीताबाई वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला.