कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील प्रसिद्ध चित्रकार दिलीप दार्वेकर यांनी आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी शाडू माती पासून बनवलेल्या गणेश मूर्तीची भेट आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत यांना दिली आहे .या पोलीस ठाण्यात गेल्या दहा वर्षापासून शाडू माती पासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना करत असतात .यावर्षी देखील चित्रकार दारवेकऱ यांनी शाडू माती पासून बनवलेली मूर्ती भेट दिली आहे . याप्रसंगी पत्रकार बांधव पोलीस कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .