महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत कन्नड तालुक्यातील अंजना पळशी प्रकल्पाचा जलपूजन सोहळा आज दि २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास आमदार संजना जाधव यांनी उपस्थित राहून नारळ अर्पण करून जलपूजन केले. यावेळी शाखा अभियंता एस.एस. गांजाळे, उपविभागीय अधिकारी ए.एच. शेख, कार्यकारी अभियंता एस.जी. शहापूरे यांच्यासह स्थानिक नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.