केंद्रातील मोदी सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली कापसावरील आयात कर रद्द केल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. यामुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडला असून आयात कर रद्द केल्याच्या निषेधार्थ किसान सभेच्या वतीने मनोर येथे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी, निदर्शने यावेळी करण्यात आली.