फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह या विशेष उपक्रमांतर्गत वाशिम येथे सायकलथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दि. २३ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालय, वाशिम येथून सुरू झाली. या स्पर्धेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी, श्री बाकलीवाल विद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे समन्वयक अमोल काळे यांच्यासह विद्यार्थी तसेच विविध शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.