धुळे दौऱ्यावर आलेल्या आदिवासी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी आदिवासी आरक्षणातील घुसखोरी सरकारपुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप केला. 'फोडा आणि राज्य करा' नीतीने सरकार समाजात कलह निर्माण करत असल्याचे ते म्हणाले. भाजप-आरएसएसला आदिवासींचे अस्तित्वच मान्य नसल्याची टीका करीत, सरकारच्या षडयंत्राविरोधात राज्यव्यापी लढा उभारणार असल्याचा इशारा दिला. आगामी निवडणुकीत संघटना राजकीय भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.