माहेश्वरी समाजाचा धार्मिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा "महेश नवमी" उत्सव दिनांक चार मे रोजी सकाळी 11 वाजता शहरात अत्यंत भाविकतेने, जल्लोषात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. महेश नवमी हा सण माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.शोभायात्रेत माहेश्वरी समाज आणि राजस्थानी समाजातील सर्व वयोगटातील पुरुष, महिला, युवक-युवती व बालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.