मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनेलवर तसेच समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये,असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मंगळवार दि.4 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता प्रसार माध्यमातून केले आहे. दरम्यान व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. "सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे