सांगोला नगरपरिषदेकडून सांगोला शहरातील नगरपालिका विहीर, कुंभार गल्ली विहीर, आठवडा बाजारातील विहीर व भारत गल्ली शाडूची विहीर, अशा चार ठिकाणी गणपती विसर्जनाची सोय केली आहे. गणपती चारही विहिरींच्या बॅरिकेटिंग बाजूंनी रात्रीच्या वेळी लाईटची उभारून व्यवस्था केली असल्याची माहिती सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी दिली आहे.