जालना जिल्ह्यात होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ड्रोनची मदत घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ड्रोन तयार करणार्या कंपनीला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्राईम एरोस्पेस कंपनीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देऊन कंपनी तयार करत असलेल्या अॅग्रिकल्चरल ड्रोन, सरवायलन्स ड्रोन, डिफेन्स ड्रोन आदीची पाहणी केली.