धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील विनायक ॲग्रो गोडाऊन फोडून हरभऱ्याचे ४३ कट्टे (२,५५९ किलो, किंमत ६.२९ लाख) चोरी करणाऱ्या गौस वहीद पठाण (रा. एकतानगर) स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गोपनीय माहितीच्या आधारे चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल आणि अशोक लेलँड वाहन जप्त करण्यात आले असून, आरोपीने साथीदारांची नावेही उघड केली आहेत. अशी माहिती पोलिसांच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी सहा वाजता देण्यात आली.