तालुक्यातील धनज पोलिस स्टेशन अंतर्गत गणेश मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांची धनज येथील पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या अनुषंगाने धनज बुद्रुक येथील एकता गणेश मंडळाने डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले. यापूर्वी त्यांनी दरवर्षी डीजे लावून हजारो रुपये खर्च करून गणेशोत्सव साजरा केला. या वर्षी सुद्धा डीजे वाल्यांना ऍडव्हान्स दिला होता.