28 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजताच्या सुमारास पाच पावली येथे वादग्रस्त पुरीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली असून हा गणपती आता प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. दरवर्षी येथे गुलाबराव पुरी हे या गणपतीची स्थापना करत होते परंतु त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे पुत्र चंद्रशेखर पुरी यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षीच्या गणपती मध्ये विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे प्रमुख मुखदर्शन म्हणून संबोधले आहे तसेच गणपती दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील शासनाचे लक्ष खेचले आहे.