मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. कासा पोलिसांच्या मदतीने घोळ गावानजीक पोलिसांनी तपासणी दरम्यान एका संशयित कारची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत गुटखा व कार असा एकूण 19 लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.