मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रकच्या टायरला आग लागल्याची घटना घडली आहे. हालोली नजीक महामार्गावर उभ्या ट्रकच्या टायरला अचानक आग लागली. ट्रकच्या जळत्या टायर जवळच एक हजार लिटर क्षमतेची डिझेलची टाकी होती, मात्र महामार्ग सुरक्षा पोलीस आणि स्थानिकांनी वेळीच ही आग विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.