आज दिनांक सात सप्टेंबर ला सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्रासाठी लेखी परीक्षा पार पडली. ही परीक्षा एकूण वीस गुणांची होती.यामध्ये तीस प्रश्नाला प्रत्येकी अर्धा मार्क असे १५ मार्क व सामाजिक उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र व निबंधाला 5 मार्क असे वीस गुण होते.यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.