जिल्ह्यातील सर्व (अनुदानित/विनाअनुदानित) आश्रमशाळांमधील बालकांसाठी गोवर व रुबेला या रोगांविरोधातील लसीकरण मोहीम १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सुरू होणाऱ्या या मोहिमेतून ५ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना सुरक्षिततेचे कवच मिळणार आहे. भारत सरकारने २०२६ पर्यंत गोवर आणि रुबेला निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.