सांगोला शहरातील शिवशक्ती हॉटेलच्या पाठीमागे पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये देशी दारू संत्रा कंपनीच्या बाटल्या, मॅकडॉल कंपनीच्या बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या बाटल्या असा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. चोरून दारूची विक्री करणारा सुहास पोपट वायदंडे वय 25 रा.खारवटवाडी सांगोला याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई 27 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.