गडचिरोली: गडचिरोली येथील विद्याभारती शिक्षण संस्था आणि गोगाव येथे झालेल्या पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबतचे निवेदन आज, २५ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने अप्पर तथा निवासी जिल्हाधिकारी मा. सूर्यवंशी यांना सादर केले. या निवेदनात, संस्थेतील भरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून