सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या संपाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत प्रांत हेमंत निकम यांनी तोडगा काढला. यानंतर तिनं दिवस सुरू असलेला संप मागे घेण्यात आला. न्याय देण्याचा शब्द मिळाल्याने सावंतवाडी शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी घेत संप मागे घेत असल्याचे सांगितले.