मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढाव ते धानोरा रस्त्यावर दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी मोटर सायकलचा अपघात होवून दोन गंभिर झाल्याची घटना घडली. अपघातातील जखमी हे दाभडी येथील रहिवासी असून, ते मोटर सायकलने कामानिमित शेंदुरजनाकडे येत होते. सदर अपघाताची माहिती प्रहार सेवक चेतन पवार यांनी शेंदुरजना अढाव येथे आरोग्यवर्धिनी केंद्रामधील डॉ. शिंदे यांच्याशी कळवून घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहीका बोलावून गंभीर जखमी रुग्णांना पुढील उपचाराकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले.